कायदेशीर आधारभूत किंमत फायद्यापेक्षा नुकसान करेल
आधारभूत किंमत(एमएसपी) म्हणजे सरकारद्वारे वेगवेगळ्या पिकांसाठी मोजलेली किंमत होय. सरकार ही किंमत त्यांच्या अन्न सुरक्षा बफर स्टॉकसाठी, गरिबांमध्ये पुनर्वितरण करण्यासाठी, महागाई कमी करण्यासाठी आणि किमती स्थिर ठेवण्यासाठी मोजते. या प्रक्रियेत शेतकऱ्यांना आर्थिक पाठबळ मिळावे, हा त्यामागे उद्देश असतो. त्यामुळे कोणतेही सरकार एमएसपी जाहीर करणे आणि या आधारभूत किमतीवर पिकांची खरेदी करण्याचे थांबवण्याची शक्यता नसते. कारण आधारभूत किमतीच्या बाजारभाव खाली गेल्यास शेतकऱ्यांना कमीतकमी आधारभूत किंमत मिळावी ह्यासाठी सरकार बाजारात उतरून भाव स्थिर करण्याचा प्रयत्न करते.